प्रकाश आंबेडकरांना भाजपकडून सुपारी; सुशीलकुमार शिंदेंचा घणाघाती आरोप  

137

सोलापूर, दि. १५ (पीसीबी) – काँग्रेसच्या  मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा मिळावा, यासाठी  वंचित बहुजन आघाडीचे नेते व उमेदवार  प्रकाश आंबेडकर यांनी  भाजपकडून सुपारी घेतली आहे, अशी टीका काँग्रेसचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार  सुशीलकुमार शिंदे यांनी  केली आहे.

सोलापुरात आयोजित आघाडीच्या मेळाव्यात शिंदे बोलत होते.  एमआयएमसोबत  युती  करताना तुमची तत्वं कुठे गेली? असा सवाल  करून प्रकाश आंबेडकरांची आघाडी म्हणजे ‘वोट कटवा’, अशी  आघाडी आहे, अशी उपरोधिक टीका शिंदे यांनी आंबेडकर यांच्यावर केली.

दरम्यान, सोलापुर लोकसभा मतदारसंघात तिरंगी  सामना रंगला आहे. भाजपने जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून  प्रकाश आंबेडकर यांनी दंड थोपाटले आहेत. त्यामुळे शिंदे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.