पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना बिस्किट वाटप

27

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या अध्यक्षतेखाली निगडी येथे बिस्किट वाटप करण्यात आले.

दरम्यान, साधारण ५० ते ५५ कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र म्हणुन  निगडी येथे बंदोबस्ताला व वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे, कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, उपाध्यक्ष अतुल राऊत, हरिष आप्पा मोरे, अमोल गाडेकर, युवराज चिंचवडे, शुभम चिंचवडे, तेजस खेडेकर, मयुरेश मडके, अक्षय पवार, अक्षय इंदलकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते  उपस्थित होते.