“पोलीस अधिकारी महाविकासआघाडीचे सरकार पाडायचा प्रयत्न करीत आहे, असं मी बोललोच नाही”

122

पुणे,दि.२०(पीसीबी) – राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली असल्याचं वृत्त लोकमत ऑनलाईनला आलं होतं. परंतु आत पोलीस अधिकारी महाविकासआघाडीचे सरकार पाडायचा प्रयत्न करीत आहे, असं मी बोललोच नाही असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

लोकमतच्या या कार्यक्रमात ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा सवाल केला होता. यावर गृहमंत्री देशमुख म्हणाले की, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान याविषयी आज पुण्यात आलेल्या गृहमंत्र्य़ांना विचारलं असता ते म्हणाले की, पोलिसांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता असे मी म्हणालोच नाही. माझ्या तोंडी हे वाक्य टाकले आहे, व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल, असं देशमुखं म्हणाले. चुकीचं वक्तव्य माझ्या तोंडी घालण्यात आलं आहे, असंही देशमुख म्हणाले.