पोलिस खाते भाजपचे विंग म्हणून काम करत आहे – प्रकाश आंबेडकर

165

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  सध्या राज्यातील पोलिस खाते भाजपचे विंग म्हणून काम करत आहे,  अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर  केली.  मुंबईत प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते.

पोलिस खात्याने पुराव्याची कागदपत्रे भाजप नेत्यासमोर सादर करण्‍यापेक्षा न्यायालयासमोर सादर करावीत. मात्र, पोलिस खाते भाजपचे विंग म्हणून का काम करत आहे, असा सवाल आंबेडकरांनी यावेळी उपस्थित केला. सादर केलेली कागदपत्रे खरी आहे की खोटी हे न्यायालय सिद्ध करेल, त्यामुळे पोलिस खाते महत्त्वाचे खाते आहे, हे मानायला तयार नसल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.

संघ आणि भाजपने समाजात निर्माण केलेली दरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून मिटवत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. नोटबंदी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात येत्या काही दिवसांत जेलभरो आंदोलन करण्‍यात येणार  आहे, असा इशारा आंबेडकर यांनी यावेळी दिला.