पोलिस कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर ससून रुग्णालयात दाखल

1430

पुणे, दि. ३ (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर पुणे सत्र न्यायालयाने बुधवार (दि.१) मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना सहा दिवसांची म्हणजेच ६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देखील सुनावण्यात आली होती.

यामुळे बुधवारी रात्री मानकरांना पोलिस कोठडीत हलवण्यात आले. तेथे त्यांनी रात्री उशीरा छातीत दुखत असल्याचे पोलिसांना सांगितले. यावर पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.