पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण

112

भोसरी, दि. १० (पीसीबी) – पोलिसात तक्रार न दिल्याच्या कारणावरून एका मजूर तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 9) सकाळी सद्गुरुनगर भोसरी येथे घडली.

शकील जलील शेख (वय 27, रा. सद्गुरूनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदर्श जगताप उर्फ कुक्या (वय अंदाजे 24) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांच्या घरून हिंजवडी येथे जात होते. सद्गुरुनगर येथे रस्त्याने पायी चालत जात असताना आरोपी रस्त्यात अगोदरच थांबले होते. फिर्यादी यांनी आरोपी आदर्श जगतात याच्या विरोधात यापूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना अडवले. शिवीगाळ करत ‘तुला लय माज आलाय’ असे म्हणत हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी आदर्श याने लाकडी बांबू फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. यानंतर आरोपी फिर्यादी यांना शिवीगाळ करत तसेच धमकी देऊन निघून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare