पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी

57

आळंदी, दि. १२ (पीसीबी) – रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले. त्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 10) दुपारी गोपाळपुरा, आळंदी येथे घडली.

गणेश विठ्ठल आबुज (वय 23, रा. सिद्धबेट, केळगाव, ता. खेड) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर उर्फ दिग्या कदम (रा. आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास गोपाळपुरा येथून सिद्धबेट येथे रस्त्याने जात होते. त्यावेळी आरोपी दिगंबर याने फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून साडेतीन हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर शिवीगाळ करत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare