पोलिसांनी दडपशाही पध्दतीने आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा सिन्नरमध्ये आडवला

68

सिन्नर, दि. १७ (पीसीबी) – विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी वसतिगृहांमध्ये सुविधा पुरवाव्यात, निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, आदिवासी मुलींना योग्य प्रकारचे संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयावर मोर्चा घेऊन निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी अडवून त्यांची रवानगी पुन्हा पुण्याकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी १३ जुलै पासून आंदोलन करणार असल्याचे निवेदन रितसर पोलिसांना दिले होते. तरीही कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत येथील पोलिसांनी विद्यार्थ्यांना नाशिककडे मार्गस्थ होण्यापासून रोखले. काही विद्यार्थ्यांसोबत पोलिसी पद्धतीने चर्चा करून सर्वांना माघारी पुणे येथे पाठविण्याची तयारी चालवली आहे. या घडल्या प्रकाराविरुद्ध विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला असून, एक शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटणार असल्याचे समजते.