‘पोलिसांना माझ्या खबरी सांगतो’ म्हणत तरुणास मारहाण

68

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) : तरुणाला शिवीगाळ करत माझ्या खबरी पोलिसांना सांगतो, असे म्हणत खुनाची धमकी दिली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री अकरा वाजता फुलेनगर चिंचवड येथे घडली.

सागर सदाशिव बनसोडे (वय 22, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित केशव शिगवण (रा. फुलेनगर, चिंचवड) आणि त्याचे दाजी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बनसोडे आणि त्यांचा मित्र सोनू बगाडे, प्रतीक गजरमल यांच्यासोबत फिरत होते. ते फुलेनगर येथील नेहराज मित्र मंडळाच्या जवळ आले असता आरोपींनी सोनू बगाडे याचे नाव घेऊन ‘मी त्याचा मर्डरच करणार आहे. मी दोन मर्डर केले आहेत. तिसरा त्याचाच मर्डर करणार आहे. माझ्या खबरी पोलिसांना सांगतो’ असे म्हणत सोनू बगाडे याला शिवीगाळ करून मारहाण केली. लोखंडी रॉड सोनू याला मारण्यासाठी आरोपींनी उगारला असता फिर्यादी मध्ये आल्याने त्यांना रॉड लागून ते जखमी झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare