पोलिसांना भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या १२ घरमालकांवर कारवाई

42

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – नियमाप्रमाणे पोलिसांना भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल १२ घरमालकांवर चिंचवड पोलिसांनी कारवाई करत खटला दाखल केला आहे. पिंपरी न्यायालयाने १२ घरमालकांपैकी पाच घरमालकांना २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा दिवसाचा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

अखिल आशोक परब, जयसिंग शंकर गोलांडे, चेतन रामचंद्र देवधर, अजय शिवशंकर गुप्ता, आणि दयाराम चौधरी अशी कारवाई करण्यात आलेल्या घरमालकांची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या मोठ्या प्रमाणात घरे बांधून ते भाड्याने देण्यात येतात. याव्दारे घरमालक बक्कळ पैसे कमवतात. शहरात गुन्हेगारांचा वावर सतत वाढत असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्याच बरोबर बाहेरुन येणारे लोंढे यामध्ये भर घातल आहेत. नुकतेच शहरातील निगडी परिसरातून अनअधिकृतपणे राहत असलेल्या काही बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांचा बांगलादेशी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले होते. तसेच इतर जिल्ह्यातून तडीपार झालेले गुंड देखील शहरात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहर परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. मात्र, सतर्क घरमालकांनी त्यांच्याकडे भाड्याने राहण्यसाठी येणाऱ्या सर्व भांडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यामध्ये पुरवल्यास गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल तसेच त्यांच्यावर जलद गतीने कारवाई करण्यात येईल. यामुळे घरमालकांनी सतर्क राहूण प्रत्येक भांडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.