पोलिसांना आयुर्वेदीक किटचे वाटप

85

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – कोरोनाच्या महामारी पासून सर्वसामान्य नागरिकांचा बचाव करण्यासाठी स्वतचा जीव धोक्यात घालून मागील दोन महिन्यांपासून रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी शहरातील अनेक मान्यवरांनी हातभार लावला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी उपमहापौर सौ. शैलजा अविनाश मोरे आणि भाजप युवा मोर्च्याचे प्रदेश सचिव अनुप अविनाश मोरे यांच्या वतीने निगडी पोलीस स्टेशनमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आयुर्वेदिक औषधाच्या किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गणेश जवातवड साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री सोनावणे साहेब, पोलीस सबइन्स्पेक्टर श्री ज्ञानेश्वर कोकाटे साहेब, डॉ. प्रेरणा बेरी, सागर आगरवाल, जयेश मोरे, आशिष राऊत, सागर घोरपडे, गौरव गोळे, शशिकांत आंग्रे, कर्डे काका, आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थिथ होते.

WhatsAppShare