पोलिसांची सिनेस्टाइल कारवाई

569

औरंगाबाद, दि. २८ (पीसीबी) – मोक्का आणि खुनाच्या आरोपात हर्सूल तुरुंगात असलेला गँगस्टर इम्रान मेहदी याची सोमवारी २ प्रकरणांत सुनावणी होती. इम्रानला हर्सूल कारागृहातून कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार करून सोडवून नेण्याचा कट त्याच्या साथीदारांनी मध्य प्रदेशमधील टोळीच्या मदतीने रचला होता. त्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी १०.३० वाजता टोळीचा गरवारे मैदान ते नारेगाव रस्त्यावर पाठलाग केला. क्रांतिगुरू लहुजी साळवे चौकात सापळा रचून टोळीला ताब्यात घेतले. तेथे टोळीचा म्होरक्या शरफू खान शकूर खानने (४५) गोळीबाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी मध्य प्रदेशातील ७ तर स्थानिक ४ गुंडांना अटक केली.