पोलिसांची कारचालकासोबत बाचाबाची; कारचालकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

173

दिल्ली, दि. १० (पीसीबी) – कारने परिवारासह घरी निघालेल्या एका मार्केटिंग अधिकाऱ्यासोबत वाहतूक पोलिसाने वाद घातल्याने त्या अधिकाऱ्याचा तीव्र ह्दयाच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी नोएडा येथे घडली असून घटनेनंतर ट्रॅफिक पोलिस फरार झाला आहे.

गौरव मुलचंद शर्मा (वय ३४, रा. नोएडा सेक्टर ५२, शताब्दी विहार) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणाच्या वृध्द पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दाद मागितली आहे.

रविवारी गौरव हा त्यांच्या कारने परिवारासह नातेवाईकांच्या घरी निघाला होता. यावेळी रस्त्यामध्ये काही पोलिसांनी त्याच्या कारवर काठी मारुण कार थांबवण्यास धमकावले. याचा जाब विचारण्यासाठी तो कारखाली उतरला यावेळी पोलिस आणि गौरवमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान गौरव याला तीव्र ह्दयाचा झटका आला आणि तो खाली कोसळला. आपला मुलगा खाली कोसळल्याचे पाहताच आई-वडील कारमधून उतरले आणि आपल्या मुलाला स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. गौरवचे वडील मूलचंद शर्मा निवृत्त अधिकारी आहेत. घटनेनंतर पोलिस पसार झाले आहेत. तर वृध्द पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दाद मागितली आहे.