पोलादपूर बस दुर्घटना; राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालय, राहूल गांधींकडून शोक

338

रायगड, दि. २८ (पीसीबी) – पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी खासगी बस ८०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला.  या अपघाताबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान कार्यालय आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून  म्हटले की,  रायगडमधील भीषण बस अपघाताची माहिती समजल्यानंतर दु:ख झाले.  मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.  शोकाकुल परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करून बस अपघातात जीव गमावलेल्यांप्रती तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष  राहुल गांधी यांनी या अपघाताबद्दल ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. भीषण बस अपघातात मृतांची माहिती मिळाल्यानंतर दु:ख झाले. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनस्थळी जाऊन सर्वोतपरी मदत करण्याचे आवाहनही राहुल गांधी यांनी  केले आहे.