पोलादपूर बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून १ लाखांची मदत

154

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – पोलादपूर येथील आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ३० मृतांच्या कुटुंबीयांना  शिवसेनेने प्रत्येकी १ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

शनिवारी (दि.२८) या बसमधून दोपोली कृषी विद्यापीठाचे ३४ कर्मचारी वर्षासहलीसाठी निघाले होते. दरम्यान,आंबेनळी घाटात धुक्यामुळे आणि निसरड्या रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण गेल्याने बस ८०० फुट खोल दरीत कोसळली. यात ३० जणांचा मृत्यू झाला तर एकजण आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. तर ३ जण अद्यापही बेपत्ता आहेत.