पोटच्या लेकरांचा गळा आवळून खून

186

सातारा, दि.९ (पीसीबी) – शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बापानेच पोटच्या दोन लेकरांचा गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गौरवी मोहिते (११), प्रतीक मोहिते (७) अशी खून झालेल्या बहीण भावाची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून संबधित तिघेजण कारमधून बेपत्ता झाले होते. बुधवारी पहाटे संबधित कार शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना सापडली. कारमध्ये दोन्ही चिमुकल्यांचा खून झाला होता. संशयित आरोपी व त्या मुलाचा बाप तेथेच होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव चंद्रकांत मोहिते असे आहे. सध्या चंद्रकांत मुंबईतील घाटकोपर येथे राहतो तर तो मूळचा कोयना नगर, रासाटी (ता. पाटण) येथील आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

WhatsAppShare