पैसे मागण्यास आल्यास तुमचे हात पाय तोडेल असे म्हणत ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक

78

सोमाटणे फाटा, दि. २२ (पीसीबी) – कमी दर्जाचे मोबाईल किट देऊन ते कीट बोगस असल्याने परत घेऊन पैसे देण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाची पाच लाख 27 हजारांची फसवणूक केली. ही घटना 18 डिसेंबर 2019 ते सहा जानेवारी 2021 या कालावधीत सोमाटणे फाटा येथे घडली.

अमित राॅय, संतोष पाठक (दोघे रा. मीरा रोड ईस्ट, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अजय सुरेश अरगडे (वय 39, रा. सोमाटणे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना कमी दर्जाचे मोबाईल किट दिले. ते किट बोगस स्वरूपाचे असल्याने सदर किट परत करून पैसे परत देतो असे आश्वासन आरोपींनी फिर्यादी यांना दिले. आश्वासन देऊन देखील आरोपीने फिर्यादी यांना पैसे परत दिले नाही. तसेच पैसे मागण्यास आल्यास तुमचे हात पाय तोडेल, अशी धमकी दिली. यामध्ये आरोपींनी फिर्यादी यांची पाच लाख 27 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare