पैसे निघत नसल्याने चोरट्यांनी चक्क एटीएमच पळवले

301

पिंपरी, दि.४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे अज्ञात चोरांनी चक्क एटीएम मशीन मोटारीत घालून पळवून नेल्याचे घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमधील चंद्रश्री कॉप्लेक्स येथील गाळा क्रमांक ११ मध्ये असणारे एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दिवसभर अज्ञात दोन चोरांनी टेहळणी केली, मध्यरात्रीच्या सुमारास स्कॉर्पिओतून येत एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न चोरांनी केला. मात्र हा प्रयत्न फसल्याने चक्क एटीएमला दोरी गुंडाळून ते मोटारीत घालून पळवून नेले आहे. एटीएममध्ये १६ लाख ९६  हजार रोख रक्कम होती अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. घटना सीसीटीव्हीत कैद होण्याच्या अगोदरच चोरांनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारला होता. त्यामुळे त्यात घटना कैद झाली नाही. अद्याप चोर फरार असून त्यांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

 

WhatsAppShare