पैसे आणि किराणा तात्काळ पोहोचल्यास नागरिक घरातून बाहेर येणार नाहीत – पी चिदंबरम

166

 

देश, दि.२६ (पीसीबी) – कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा अंदाज घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत २१ दिवसासाठी लॉकडाऊन असणार असल्याची घोषणा केली आहे. मोदींच्या या घोषणेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. मात्र या लॉकडाऊनचे दूरगामी परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहेत.

पी चिदंबरम यांनी मोदींच्या भारत लॉकडाऊनचे स्वागत केले आहे. मात्र अशा निर्णयांनी अर्थव्यस्थेला मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा वेळी सर्वसामान्यांच्या खिशात पैसा असणे आवश्यक असते. त्यासाठी सरकारने विशेष तरतूद करून सर्वसामान्यांच्या खिशात पैसा कसा जाईल याकडे लक्ष द्यावे. लॉकडाऊनच्या स्थितीत सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती अधिक खालावते. हे पाहता पैसे आणि किराणा तात्काळ पोहोचल्यास ते घरातून बाहेर येणार नाहीत.

 

WhatsAppShare