पेप्सी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी निवृत्त

30

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – पेप्सी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ६२ वर्षीय इंदिरा नूयी १२ वर्षांनंतर आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. याबाबतची घोषणा कंपनी प्रशासनाने नुकतीच केली आहे. आता इंदिरा नूयी यांच्या जागी रेमन लॅगार्ट धुरा सांभाळणार आहेत. ते पेप्सी कंपनीचे सहावे सीईओ असतील.

इंदिरा नूयी पेप्सी कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ होत्या. येत्या ३ ऑक्टोबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पेप्सी कंपनीशी निगडीत आहेत. पेप्सिको कंपनीत काम करणे ही माझ्यासाठी आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. मला अभिमान आहे की, गेल्या १२ वर्षांत आम्ही फक्त भागधारकांसह सर्वांसाठी चांगली कामगिरी केली आहे, असे इंदिरा नूयी यांनी म्हटले आहे.