पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच; अमरावती, सोलापूरमध्ये सर्वात महाग पेट्रोल

142

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – पेट्रोल-डिझेलचे दर काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. मुंबईत उच्चांक गाठलेल्या पेट्रोल दराने आजही आगेकूच कायम ठेवली आहे. मुंबईतील आजचा पेट्रोल दर ८६.७२ रुपये प्रति लिटर इतका आहे. गेल्या चार दिवसात मुंबईतील पेट्रोल दरात १ रुपये ६२ पैसे इतकी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळते. अमरावतीत एक लिटर पेट्रोलसाठी ८७.९७ रुपये मोजावेल लागत आहेत. महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत सोलापूर  दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोलापुरात पेट्रोलचा आजचा दर  ८७.७७ रुपये लिटर इतका आहे.

मुंबईत रविवारी पेट्रोलसाठी लिटरमागे तब्बल ८६.२५  रुपये मोजावे लागले होते, काल सोमवारी पेट्रोलने त्यापुढे म्हणजेच ८६.५६ रुपयांपर्यंत मजल मारली. आजही ही आगेकूच कायम राहात पेट्रोल ८६.७२ रुपयांपर्यंत पोहोचले. पेट्रोलचा हा मुंबईतील आजपर्यंतचा सर्वोच्च दर आहे.

दुसरीकडे डिझेलही पेट्रोल दराला गाठत आहे. कारण पेट्रोलने नवा उच्चांक गाठल्यानंतर डिझेलनेही आगेकूच कायम ठेवली.  मुंबईतील डिझेलचा प्रतिलिटर दर ७५.७४ रुपये इतका आहे.