पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच; अमरावती, सोलापूर सर्वात महाग पेट्रोल

69

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – पेट्रोल-डिझेलचे दर काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. मुंबईत उच्चांक गाठलेल्या पेट्रोल दराने आजही आगेकूच कायम ठेवली आहे. मुंबईतील आजचा पेट्रोल दर ८६.७२ रुपये प्रति लिटर इतका आहे. गेल्या चार दिवसात मुंबईतील पेट्रोल दरात १ रुपये ६२ पैसे इतकी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळते. अमरावतीत एक लिटर पेट्रोलसाठी ८७.९७ रुपये मोजावेल लागत आहेत. महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत सोलापूर  दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोलापुरात पेट्रोलचा आजचा दर  ८७.७७ रुपये लिटर इतका आहे.