पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ

234

मुंबई, दि. २ (पीसीबी) – सलग दोन दिवसांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल न करता तिसऱ्या दिवशी तेल कंपन्यांनी दर वाढवले आहेत. गुरूवारी महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

गुरूवारी महानगरांमध्ये पेट्रोलचे दर ११ ते १५ पैशांनी वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोल १५ पैशांनी वाढून ७६.४३ च्या पातळीवर मिळत आहे. कोलकत्यात ते ७९.३३ रूपये आणि मुंबईत ८३.८७ रूपये प्रति लिटरने मिळत आहे. दुसरीकडे, चेन्नईत ७९.३९ रूपये प्रति लिटर दर आकारले जात आहेत.