पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ

949

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असून  मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये डिझेलच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहोचल्या आहेत. डिझेलच्या दरात १४ पैसे तर पेट्रोलच्या दरात १३ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज डिझेल ७३ रुपये ८४ पैशांनी मिळत आहे. तर   पेट्रोलचा दर ८५ रुपये ४५ पैसे असा आहे.

तर दिल्लीत डिझेलचा प्रतिलिटर दर ६९.४६ रुपयांवर पोहोचला असून तो आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे. तर पेट्रोल ७८ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत सेल्स टॅक्स किंवा व्हॅट कमी असल्याने दिल्लीत इंधनाचे दर कमी आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयामधील घसरण, यामुळे डिझेलने नवा विक्रमी दर गाठला आहे. सोबत पेट्रोलचे दरही विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत.