पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा; नितेश राणेंचे शिवसेनेवर टिकास्त्र

160

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या ढिसाळ कामकाजावर टीका होऊ लागली आहे. आमदार नितेश राणे यांनी यानिमित्ताने शिवसेनेवर टीका करत पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा असा टोला लगावला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ‘पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाइट लाइफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली महापालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही ?’, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, ‘आता पुन्हा तोच आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आणि ब्रीज ऑडिटची चर्चा सुरु होईल. याचा परिणाम काहीच होणार नाही.