पॅरिसमध्ये स्पायडरमॅनने वाचवला इमारतीवरुन पडणाऱ्या लहान मुलाचा जीव

29

पॅरिस, दि. २९ (पीसीबी) – फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडत असलेल्या लहान मुलाचा जीव एका स्पायडरमॅन सारख्या कसरती करणाऱ्या व्यक्तीने वाचवला आहे.

मामोदोऊ गसामा असे या धाडसी तरुणाचे नाव आहे.

पॅरिसमध्ये शनिवारी संध्याकाळी एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन चार वर्षांचा मुलगा बाल्कनीतून पडत असल्याचे मामोदोऊने पाहिले. मग जीवाची पर्वा न करता मामोदोऊने तळ मजल्यावरुनच वर चढायला सुरुवात केली. कोणत्याही सुरक्षेशिवाय बघता बघता एक मिनिटाच्या आत चौथ्या मजल्यावर जाऊन त्याने लहान मुलाचा जीव वाचवला. या घटनेच्या वेळी चिमुकला घरात एकटा असल्याचे समोर आले आहे. यानंतर मामोदोऊचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पॅरिसमध्ये त्याला एक हिरो म्हणून पाहिले जात आहे. तर अनेकांनी त्यांना ‘स्पायडरमॅन’ ची उपमाही दिली आहे.