पृथ्वीच्या इतिहासातल्या नव्या ‘मेघालय’ युगाचा शोध

68

लंडन, दि. १९ (पीसीबी) – भूशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातल्या एका नव्या युगाचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे याचं भारतातील मेघालयशी कनेक्शन आहे. आजपासून ४,२०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या युगाला ‘मेघालय युग’ असे नाव दिले आहे. या कालखंडात जगभर अचानक खूप दुष्काळ पडला होता आणि तापमानातही घट झाली होती. परिणामी जगातल्या अनेक संस्कृती नामशेष झाल्या होत्या.

संशोधकांचे एका आंतरराष्ट्रीय पथकाने मेघालयातल्या एका गुहेतल्या छतातून जमिनीवर सांडलेला चुन्याचा ढीग किंवा स्टॅलेग्माइट जमा केला. यामुळे पृथ्वीच्या इतिहासात घडलेली सर्वात लहान जलवायू परिवर्तनाची घटना परिभाषित होण्यास मदत झाली. म्हणून या युगाला मेघालय युग असे नाव देण्यात आले.