पूर ओसरल्याने मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता  

176

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – पवना नदीला आलेल्या महापुरात चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेले होते. गेल्या चार-पाच दिवसापासून पूर ओसरला आहे. पाणी पात्रात गेल्याने मंदिराच्या परिसरात साचलेला चिखल काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मंदिरातील स्वच्छता करण्यात येत आहे. पुराच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात राडारोडा वाहून आला होता. मंदिराच्या परिसरात हा राडरोडा साचला होता. चिखलही साचून राहिला होता. हा चिखल काढून साफसफाई करण्यात येत आहे.