पूर्व वैमनस्यातून तरुणावर खूनी हल्ला

80

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर तलवारीने वार करत खूनी हल्ला केला. ही घटना पिंपरी येथे मंगळवारी (दि. 20) रात्री घडली.

आकाश गायकवाड उर्फ पोंग्या, शक्ती, छत्र्या आणि हर्ष बोध उर्फ लड्ड्या (सर्व रा. सॅनिटरी चाळ, पिंपरी ब्रिजखाली, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावे आहेत. सलमान रमजान शेख (वय 25 रा. नढेनगर, काळेवाडी) असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी सलमान हा पिंपरी भाजी मंडई येथील सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर लघुशंका करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच आरोपी आकाश गायकवाड उर्फ पोंग्या याने त्याच्या जवळील तलवारीने सलमान याला जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. तसेच आरोपी हर्ष उर्फ लड्डा याने फिर्यादी सलमान यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare