‘….आणि म्हणूनच त्यांना बेदम मारहाण केली गेली’

49

वाकड, दि. २२ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून दोघा भावांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 21) डांगे चौक, वाकड येथे घडली.

मंगेश सोपान गवळी (वय 47, रा. इंगोले वस्ती, पिंपळे निलख) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋतिक कल्याण क्षीरसागर (वय 21), परशुराम सुनील माने (वय 22, दोघे. रा. काळाखडक, वाकड), रोहित नागनाथ गायकवाड (वय 21, रा. शेवाळवाडी हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मोठे भाऊ नामदेव गवळी गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या मोठ्या भावाला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले. आरोपींनी फिर्यादी यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच रस्त्यावरील दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारला. यात फिर्यादी जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare