पूर्ववैमनस्यातून तरुणाला पाईप आणि झाडाच्या कुंडीने मारहाण..

102

कासारवाडी, दि. १७ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांनी मिळून तरुणाला पाईप आणि झाडाच्या कुंडीने मारून जखमी केले. ही घटना कासारवाडी येथे रविवारी (दि. 16) मध्यरात्री घडली.

शाकिब रफिक शेख (वय 28, रा. कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अन्वर अजिज शेख (वय 27), मुन्ना उर्फ मुनीर शेख (वय 26) आणि सलमान (वय 25. पुर्ण नाव माहीती नाही. सर्व रा. दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाकिब शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घराजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांना घराबाहेर बोलावून शिवीगाळ केली आरोपी सलमान याने स्टीलच्या पाईपने डाव्या खांद्यावर, पाठीत, उजव्या हाताच्या मनगटावर मारले. आरोपी मुन्ना याने फिर्यादी यांच्या डोक्यात कुंडी मारून जबर दुखापत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन तपास करीत आहेत.