पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

23

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने डोक्यात मारून तरुणाला जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी ओपन भाजी मंडई येथे सार्वजनिक ठिकाणी घडली.

राजकुमार श्रीबन्सीगोपाल यादव (वय 30, रा. थेरगाव, काळेवाडी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 26) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तन्वीर शेख (वय 30), सुनील यादव (वय 28, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. फिर्यादी हे रविवारी पिंपरी ओपन भाजी मंडईत भाजी विक्री करीत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी तन्वीर शेख याने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तसेच आरोपी सुनील यादव याने शिवीगाळ करून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare