पूर्ववैमनस्यातून डोक्यात बिअरची बाटली फोडली

26

चाकण, दि. २७ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाच्या डोक्‍यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 25) रात्री चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली.

सतीश सूर्यवंशी (वय 32, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), रवींद्र भालेराव ऊर्फ गोट्या (वय 23, पत्ता माहिती नाही) आणि त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सोमनाथ शामराव लोखंडे (वय 39, रा. भोसरी) असे जखमी व्यक्‍तीचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 26) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्यवंशी आणि फिर्यादी लोखंडे हे शेजारी राहण्यास आहेत. त्यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून सूर्यवंशी याने लोखंडे यांना ढकलून दिले. त्यानंतर आरोपी गोट्या याने फिर्यादी यांच्या डोक्‍यात बिअरची बाटली फोडली. त्यानंतर सर्वांनी मिळून फिर्यादी यांना मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare