पूर्ववैमनस्यातून एकमेकांना मारहाण; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

87

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 11) रात्री सव्वासात वाजता कुमार प्रिन्सविले सोसायटीच्या समोरील रोडवर मोशी येथे घडली.

प्रदीप शिवशंकर दहातोंडे (वय 24, रा. जाधववाडी, चिखली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी दोन महिन्यांपूर्वी आरोपी मुलाला शिवीगाळ केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा शिवीगाळ करून ‘तू जाधववाडी भागातील दादा आहे का’ अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने ‘थांब तुला सांगतो’ असे म्हणून लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली.

याच्या परस्पर विरोधात अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप दहातोंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी आरोपीची जाधववाडी येथील रिक्षा स्टॅन्डवर भांडण झाले होते. त्या भांडणात फिर्यादी होते, असा आरोपीचा गैरसमज होता. त्यातून आरोपीने ‘तू भाई आहेस का’ असे म्हणत दगडाने फिर्यादी यांना मारहाण करून दुखापत केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare