पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

120

निगडी, दि. १३ (पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलाला शिवीगाळ व हाताने मारहाण करत कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 11) सायंकाळी ओटास्कीम, निगडी येथे घडली.

क्रिस्टीफर अाॅलविन सालढाणा (वय 16, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शब्बीर (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र मंगळवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी शब्बीर तिथे आला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याने फिर्यादी यांच्या शर्टाची कॉलर पकडली. जोरात कानाखाली मारून शिवीगाळी व हाताने मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या पाठीत मारून त्यांना गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare