पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५० लाखांचा धनादेश राष्ट्रवादीकडून मु्ख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

133

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या मदतीचा  धनादेश  आज (मंगळवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.  

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक, आमदार जितेंद्र आव्हाड, हेमंत टकले, विद्याताई चव्हाण, अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण  यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत २५ वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदनही  देण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानंतर बारामतीतून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटीचा निधी संकलित झाला होता. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. आणि राज्य सरकारने पूरग्रस्तांना घरे बांधून द्यावीत, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.