पु.ल. देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला निगडीतून अटक

145

निगडी, दि. २५ (पीसीबी) –  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी निगडी परिसरातून अटक केली आहे.

जितसिंग राजपालसिंग टाक (वय २४, रा. बिराजदार नगर, वैदूवादी, हडपसर ) असे या सराईत चोरट्याचे  नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  टाक हा निगडी येथे क्रिकेट खेळात असल्याची खबर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून  मिळाली होती. त्यावर पाटील यांनी आपल्या पथकासह निगडी येथे सापळा रचून जितसिंग याला अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने पु.ल देशपांडे यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबुल केले, मात्र तेथे त्याच्या हाती पुस्तकांशिवाय काही लागले नाही. या गुन्ह्यात शामिल इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

दरम्यान अटक करण्यात आलेला जितसिंग हा सराईत गुन्हेगार असून भोसरी, डेक्कन, आणि बंडगार्डन पोलिस ठाणे हद्दीत देखील त्याने चोरी केल्याचे समोर आले आहे.