पु ना गाडगीळ दुकानातून सोन्याचे पेंडंट चोरीला

210

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – चिंचवड येथील पु ना गाडगीळ या सोन्याच्या दुकानातून अज्ञाताने 85 हजारांचे सोन्याचे पेंडंट चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 24) सायंकाळी घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास चिंचवड मधील पु ना गाडगीळ या सोन्याच्या दुकानात गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञाताने त्यांचे 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.