पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरीकरांनी काढली मदतफेरी

210

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – सांगली, कोल्हापूरातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. या मदत फेरीत पिंपरीतील नागरिक, सिंधी, पंजाबी बांधवांनी कपडे, खाद्यपदार्थ, धान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच चप्पल, चादर, ब्लँकेट असे अनेक गोष्टीची सढळ मदत केली. त्याच बरोबर दान पेटीतही या फेरीत फिरविण्यात आली त्यातही नागरिकांनी सढळ हाताने मदत केली. हे सर्व जमा झालेले साहित्य दोन दिवसात पूरग्रस्तांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

मदत फेरीत तीन छोटे टेंपो घेऊन सामाजिक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पिंपरी पासून वाघेरे कॉलनी मार्गे, संत सावतामाळी मंदिर, तपोवन रोडने भाटनगर मार्गे पिंपरी मेन बझार, शगुन चौक, साई चौक मार्गे अशोक टॉकीज, पिंपरी पॉवर हौस मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशी मदत फेरी काढण्यात आली.

यावेळी जमा झालेले तांदूळ, साखर, डाळी असे अनेक प्रकारचे अन्न धान्य स्वच्छ करून दोन दोन किलोचे पॅकिंग करण्याचे काम पिंपरीतील मातृशक्ति महिला वर्ग श्री काळभैरवनाथ मंदिरात करत आहेत. यावेळी या मदत फेरीत बजरंग दल, सोलापूर विभाग सह संयोजक कुणाल साठे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गोलांडे, शेखर अहिरराव, गौरव कुदळे, प्रविण शिंदे, अतुल वाणी, अनिल कारेकर, कुणाल सातव, महेश मोटवणी, अभिभाऊ चव्हाण, मुकुंद चव्हाण तसेच बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.