“पुन्हा लॉकडाऊन लावणे कोणत्याही स्वरूपात परवडणारे नाही, प्रत्येकांनी खबरदारी घ्यावी” – पाथ॔ पवार

141

पिंपरी, दि. 1 (पीसीबी) : दक्षिण आफ्रिकेतून पिंपरी चिंचवडला आलेले दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. नव्या विषाणूचा संसर्ग झाला की नाही हे अद्याप निश्चित नाही. परंतु, प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. पुन्हा लॉकडाऊन लावणे कोणत्याही स्वरूपात परवडणारे नाही. असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते पाथ॔ पवार यांनी टिट्व्दारे व्यक्त केले आहे. दरम्यान, ‘लोकशक्ती न्यूज’ने याबाबत आज वृत्त प्रसारित केलं होतं, त्यावर पवार यांनी पिंपरी चिंचवडकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने पून्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्राॅन व्हेरीयंन्ट कोरोना संसग॔ वेगाने पसरत आहे. नायजेरिया येथून दोघेजण शहरात आल्यानंतर कोरोना पाॅझिटिव्ह झाले आहेत. त्यांच्या संपर्कातील एक कोरोना बाधित झाला आहे. त्याची धास्ती पिंपरी चिंचवडकरांना लागली आहे.

त्या तिघांवर पिंपरीच्या जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघांची प्रकृती स्थिर आहे. माञ, त्यांच्या घशातील घेतलेल्या द्रव्यांचा अहवाल आलेला नाही. त्यानूसार ओमिक्राॅन व्हेरीयंन्ट कोरोना संसग॔ लागण आहे की नाही हे निश्चित झाले नाही. तरीही नागरिकांनी सतर्क रहावे. स्वतःची काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करावे, असेही वैद्यकीय विभागांने कळविले आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक घडामोडीवर पाथ॔ पवार लक्ष ठेवून आहेत. त्यांनी केलेल्या टिट़ मध्ये म्हटले आहे की,  दक्षिण आफ्रिकेतून पिंपरी चिंचवडला आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. नव्या विषाणूचा संसर्ग झाला की नाही हे अद्याप निश्चित नाही.परंतु,प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.पुन्हा लॉकडाऊन लावणे कोणत्याही स्वरूपात परवडणारे नाही.आर्थिक घडी अजून विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम दूरगामी असेल.