पुन्हा एकदा धमकी, “मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू”

54

मुंबई,दि.३० (पीसीबी) – २६ नोव्हेंबर 200८, या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरवून सोडला होता. त्याच्या आठवणी आजही अंगावर शहारे आणतात. त्यातच आता भर म्हणून “ताज हॉटेल वर २६/११ सारखा हल्ला पुन्हा होणार” अशी धमकी देणारा निनावी कॉल काल रात्री ताज हॉटेल मध्ये आला.

कराची स्टॉक एक्सचेंज वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता ताज हॉटेल वरती पुन्हा एकदा २६/११ सारखा हल्ला होणार असल्याची धमकी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव ‘सुलतान’ असल्याचं सांगितलं आहे. मुंबईतील ताज हॉटलेला पाकिस्तान मधील कराची येथून फोन केला गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

धमकीचा फोन आल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ताज हॉटेलच्या सुरक्षेची पाहणी केली व सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. प्रत्येक बारीक हालचालींवरती पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. तसेच मुंबईतील सर्व किनारपट्टीवरील सुरक्षाव्यवस्था सुद्धा वाढवण्यात आली आहे.

WhatsAppShare