पुनावळेत भरदिवसा बंद घरातील ८ लाखाचा मुद्देमाल लांबविला

175

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – भरदिवसा बंद घराचे कुलूप उटकटून अज्ञात चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यासह सुमारे ८ लाखाचे मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान पुनावळेतील राम मंदीराजवळ घडली.

या प्रकरणी वैभव गोरक्षनाथ वाघ (वय ३१, रा. गगनगिरी सदन, राम मंदीर, पुनावळे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाऱ, फिर्यादी वैभव हे नोकरी करतात. गुरूवारी (दि. ६) दुपारी ते कामाला गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने ते राहत असलेली राम मंदीजवळील गगणगिरी सदनमधील रुमचे कुलूप उटकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील असलेल्या कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ८ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.