पुतण्याला बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी पळवली

1

निगडी,दि.०५(पीसीबी) – पुतण्याला बसमध्ये बसवून देण्यासष्ठी निगडी येथील बस स्थानकावर आलेल्या 81 वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील 60 हजारांची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी नकळत चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी दहा वाजता यमुनानगर, निगडी येथे घडली.

ज्ञानेश्वर भाऊराव साठे (वय 81, रा. चंदननगर) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साठे त्यांच्या पुतण्याला स्वारगेटकडे जाणा-या बसमध्ये बसवून देण्यासाठी यमुनानगर, निगडी येथील बस स्टॉपवर थांबले होते. स्वारगेटकडे जाणा-या बसमध्ये बसवून देत असताना अज्ञात चोरट्यांनी बसमध्ये बसण्यासाठी गर्दीचा बहाणा करून नकळत साठे यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची 60 हजारांची सोन्याची साखळी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare