पुण्यात ९० वर्ष जुना वाडा कोसळला; जीवितहानी नाही

174

पुणे, दि. १६ (पीसीबी) – रविवार पेठेतील भांडी आळीमध्ये ९० वर्ष जुना वाडा कोसळल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी ९ च्या सुमारास घडली. सोमवारी संध्याकाळीच हा वाडा खाली करण्यात आला होता. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठेतील भांडी आळीमध्ये हा ९० वर्षे जुना वाडा धोकादायक असल्याची नोटीस पुणे महापालिकेने बजावली होती. यामुळे सोमवारी (दि.१५) संध्याकाळीच हा वाडा रिकामा करण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी ९ च्या सुमारास हा दुमजली वाडा कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाड्याला लागूनच असणारा आणखी एक दुमजली वाडा कुठल्याही क्षणी कोसळू शकतो. त्यामुळे हा वाडाही तत्काळ खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.