पुण्यात ८ हजार किलो कॅरीबॅग ग्लास आणि थर्माकोल जप्त, ३ लाख ६९ हजाराचा दंड वसूल

188

पुणे, दि. २३ (पीसीबी) – राज्यात आजपासून प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदी लागू करण्यात आली असून प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील हॉटेल, दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई पुण्यात देखील करण्यात येत आहे. आज सकाळ पासून २ वाजेपर्यंत ८ हजार ७११ किलो कॅरीबँग, ग्लास आणि थर्माकोल पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून शहरातील हॉटेल आणि दुकानदाराकडून जप्त केला आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६९९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती धनकचरा विभागाने दिली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार, महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत प्लास्टिक बंदीवर कारवाई करण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयामार्फत सकाळी १० वाजतल्यापासून कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईमध्ये किराणा दुकानदार, बेकरी चालक, कपड्याचे शॉप यासह अनेक दुकानदारावर कारवाई केली असून यात कॅरीबॅग आणि ग्लास असा माल मिळून ८७११ किलो आणि थर्माकोल ७५ किलो जप्त करण्यात आला आहे. या कारवाईतून ३ लाख ६९ हजार १०० रुपयांचा दंड वसून केला आहे. येत्या काळात अधिक तीव्र कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक बंदीचे महत्व नागरिकांना सांगितले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.