पुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन

97

पुणे, दि. २१ (पीसीबी) – विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदन यांच्या संयुक्त विद्यमाने कलाउत्सवाचे २३ ते २६ ऑगस्ट या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व कलादालनात होणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत.

२४ ऑगस्टला दुपारी ४ ते ६ यावेळेत विलास चोरमुले हे व्यक्तिचित्रण विषयी प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. २५ ऑगस्टला दुपारी ४ ते ६ यावेळेत अच्युत पालव हे अक्षरलेखन याबाबत प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. तर २६ ऑगस्टला दुपारी ३ ते ५ यावेळेत निलेश जाधव इलस्ट्रेशनचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून विवेक खटावकर, चारूहास पंडित, प्रविण तरडे,  महेश साळगांवकर, रमेश परदेशी, मेघराज राजे भोसले, शिरीष मोहिते, किशोर शिंदे, बाळासाहेब दामेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

अधिक माहितीसाठी स्वप्निल नाईक (८२०८४७१३९९), चेतन धोत्रे (९८८१२८८५५८), विजय महामुलकर (७७०९५५५५५२) यांच्याशी संपर्क साधवा.