पुण्यात सोनसाखळी चोरणारे कल्याणमधील दोन चोरटे गजाआड

78

पुणे, दि. १६ (पीसीबी) – कल्याण येथून पुण्यात येऊन सोन साखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. हे दोघे महिन्यातून एकदा पुण्यात येत असत. पुण्यातील औंध भागात मागील सात महिन्यांपासून या दोघांना उच्छाद मांडला होता. महिन्यात एकदात चोरी करून जात असल्याने पोलिसांना डोकेदुखीचा विषय ठरत होता. परंतू खडकी पोलिसांनी सापळा रजून चोरी करताना दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

किशोर धावरी (वय २८) आणि राजेश कंडारे (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपीकडून १९३ ग्राम सोन्याचे ५ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने आणि ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केल्या चोरट्यांकडून ९ चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यांना पकडण्यासाठी सिसिटीव्हीचा मोठा उपयोग झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी चोरी करताना नंबर असलेल्या गाडीचा उपयोग करत होते. शिवाय पोलिसांना चकमा देऊन दोघे पळून जात असत. ७ जून रोजी सकाळी एक महिला रस्त्याने जात असताना हे दोघे मागून आले आणि गळ्यातील मंगळसूत्र घेवून पळून गेले. महिलेने ताबडतोब फोनवरून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. पोलिस तपास करत आहेत.