पुण्यात समोश्याच्या चटणीमध्ये मेलेला उंदीर आढळला

1103

पुणे, दि. १५ (पीसीबी) – समोश्याच्या गोड चटणीमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कलमा नेहरु हॉस्पिटलजवळील शारदा स्वीट सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी एका ग्राहकाला देण्यात आलेल्या समोश्याच्या चटणीमध्ये मेलेला उंदीर आढळला.

या घटनेची माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारदा स्वीट सेंटरमध्ये येऊन वेगवेगळ्या पदार्थांचे नुमने तपासणीसाठी जमा केले आहेत. हे सर्व पदार्थ चाचणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत शारदा स्वीट्स हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बदलापूरमधील एका स्नॅक्स कॉर्नरमध्ये वडापावच्या वड्यामध्ये चक्क मेलेली पाल सापडली होती. बदलापूर पश्चिमेकडील ओम साई स्नॅक्समध्ये एका ग्राहकाने वडापाव विकत घेतला असता त्याला वड्यामध्ये मृत अवस्थेतील पाल अढळून आली होती.  पालिकेने हे दुकान सील केले आहे.