पुण्यात लहान मुलगा पडला म्हणून मोठ्या मुलांना अमानुष मारहाण करणाऱ्या वडिलांना अटक

136

पुणे, दि. १७ (पीसीबी) – लहान मुलगा पडला म्ह्णून मोठ्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या वडिलांना विमानतळ पोलीसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमानतळ भागात राहणाऱ्या कुटुंबात ११वर्ष, ९ वर्ष आणि त्यापेक्षा कमी असे तीन अल्पवयीन मुले आहेत. यातील दोन मोठे भाऊ लहान भावाशी खेळत असताना अचानक तो पलंगावरून खाली पडला. त्यामुळे संताप अनावर झालेल्या वडिलांना मोठ्या दोन मुलांना केबल वायरने अमानुष मारहाण केली. हा प्रकार सुरु असताना ही मुले जोरजोरात ओरडत होती. त्यावेळी हा आवाज ऐकून एका व्यक्तीने बाल हक्क कृती समितीला कळविले. त्यानुसार समितीने प्रत्यक्ष माहिती घेऊन विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये बाल हक्क कायद्यानुसार त्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी वडिलांना अटक केली असून न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.