पुण्यात रेल्वेसमोर उडी घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

0
4127

पुणे, दि. २७ (पीसीबी) – पुण्यातील संगम पुलाजवळ रेल्वेसमोर उडी घेऊन मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास समोर आली.

साजन शंकर सानप (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक साजन सानप हे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास पुण्याहून शिवाजीनगरकडे जात होते. यावेळी त्यांनी अचानक रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेची त्यांना जोरदार धडक बसली. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते पुण्याला का आणि कोणाकडे आले होते हे अद्या समजू शकले नाही. तसेच आत्महत्येचे कारण देखील अस्पष्ट आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सानप यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली होती.  त्यातूनच तर त्यांनी आत्महत्या केली नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे. तर सानप यांनी आत्महत्या केली नसून हा अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.